• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • सपाला मतदान न करणार्‍या मुस्लिमांचे डीएनए तपासावेत - अबू आझमी

सपाला मतदान न करणार्‍या मुस्लिमांचे डीएनए तपासावेत - अबू आझमी

  • Share this:

abu_asim_azmi_western_culture_and_fashion_cause_rapes102 मे : समाजवादी पक्षाचे  नेते अबू आझमी हे पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्‍यता आहे. समाजवादी पक्षाला मतदान न करणार्‍या मुस्लिमांनी स्वतःचे डीएनए तपासून घ्यावेत, असं वक्तव्य करून अबू आझमी यांनी पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. खालिदाबाद येथील प्रचारसभेत सपाचे आझमी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

'जे मुस्लिम समाजवादी पक्षाला मत देत नाहीत त्यांना खरे मुस्लिम म्हणवता येणार नाही. अशांची 'डीएनए' चाचणी घेऊन ते संघातील तर नहीत ना? हे पहावे लागेल.' असं आणखी एक वादळ निर्माण करणारं विधान सपाचे आझमी यांनी केलं आहे.

तर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा निशाणा साधत ‘त्यांना पाकिस्तानातपाठवलं पाहिजे,’ असं म्हटलं आहे.

पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर दोन्ही देशांमध्ये दुरावा निर्माण होईल असं विधान केलं होतं. त्याविषयी लालूप्रसाद यादव यांना विचारल्यानंतर मोदींनाच पाकिस्तानात पाठवलं पाहिजे असं लालूप्रसाद यांनी म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
First published: