13 डिसेंबर : संसदेवरच्या हल्ल्याला आज तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपराष्ट्रपती हमीद अन्सारीही सोबत होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, गृहमंत्री राजनाथ सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
13 डिसेंबर 2001 ला संसदेवर हा अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात आपल्या बहादूर जवानांनी 5 दहशतवाद्यांना ठार केलं होतं. या हल्ल्यात 9 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफजल गुरूला 9 फेब्रुवारी 2013 ला फाशी देण्यात आली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++