31 ऑगस्ट : शीना बोराच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला आज (सोमवारी ) कोर्टात हजर केलं जाणार आहे. तिच्यासोबत तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांना देखील आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. या तिघांची कोठडी वाढवून मागण्यासाठी त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. मात्र यासाठी पोलिसांना पुरेसे पुरावे मिळाले आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, 2012मध्ये इंद्राणी मुखर्जीने तिचा मुलगा आणि शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईल बोरा याचीही हत्या करण्याचा कट रचला होता. इंद्राणीनं मिखाईलला तीनवेळा मारण्याचा प्रयत्न केला होता. शीनाच्या हत्येआधी ती तीनवेळा गुवाहाटीला गेली होती. त्यावेळी तिनं मिखाईलला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मिखाईलला वेडा ठरवण्यासाठी तिने एका मानसोपचारतज्ज्ञाला संपर्क केला होता. इतकंच नाही, ज्या दिवशी शीनाची हत्या झाली, त्या दिवशी इंद्राणीने मिखाईलला ड्रग्ज दिलं होतं. मात्र, संशय आल्यानं मिखाईल इंद्राणीच्या तावडीतून कसाबसा निसटला. मिखाईलनं स्वत: हा जबाब नोंदवल्याचं अधिकार्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर, इंद्राणीने मिखाईलला मारल्यानंतर त्याचं शव ठेवण्यासाठी भलीमोठी सूटकेसही विकत घेतली होती. ही सूटकेस पोलिसांच्या हाती लागली आहे.
दरम्यान, शीना बोरा हत्या प्रकरणात पोलिसांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केली असून, रविवारी आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याय़ाचा घटनाक्रम उलगडला. शनिवारी रात्रीही आरोपींची कसून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं पेणमधील गागोदे गावात रविवारी सकाळी आरोपींना घटनास्थळी नेण्यात आलं होतं, मात्र घटनास्थळी न थांबताच ते तिथून निघून गेले. यामागचं नेमक कारण अद्याप समजू शकलं नाही. त्यामुळे पोलीस आज त्यांच्याकडे उपलब्ध असणारे सर्व पुरावे सादर करतील आणि त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी करतील असं सुत्रांनी सांगितलं आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++