20 नोव्हेंबर : शीना बोरा हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून स्टार इंडियाचे माजी सीईओ आणि इंद्राणी मुखर्जींचे पती पीटर मुखर्जी यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीटर मुखर्जींना काल (गुरूवारी) सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) दुपारी पीटर यांना कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयाने पीटर मुखर्जींना 23 नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. याशिवाय, इंद्राणी मुखर्जी, तिचे दुसरे पती संजीव खन्ना आणि तिचा ड्रायव्हर श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पीटर मुखर्जी यांचाही या हत्याप्रकरणात इंद्राणी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्या इतकाच सहभाग असल्याचा दावा यावेळी सीबीआयने कोर्टासमोर केला. कलम 302 अंतर्गत पीटर मुखर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पीटर मुखर्जींना झालेली अटक आणि खुनाच्या गुन्ह्याची नोंद यामुळे आता मुंबई पोलिसांच्या तपासाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या हत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पीटरला तब्बल दोन-तीन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी त्याच्याकडून विसंगत माहिती दिली जात असल्याचंही सांगितलं गेलं. तरीही पीटरला अटक करण्यात आली नव्हती. सीबीआयच्या चौकशीतही पीटर मुखर्जींच्या जबाबात विसंगती आढळल्यानेच या माहितीची शहानिशा करण्यासाठी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली होती.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++