• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • शिवाजी पार्कात वायफाय कुणाचं? शिवसेना-मनसेत नवा वाद

शिवाजी पार्कात वायफाय कुणाचं? शिवसेना-मनसेत नवा वाद

  • Share this:
uudhav raj 03   जुलै :  शिवाजी पार्कात वायफाय कुणाचं यावरून शिवसेना-मनसेत नवा वाद पेटला आहे. शिवसेनेने विलेपार्ले आणि शिवाजी पार्क सोडून कुठंही आपला पायलट प्रोजेक्ट करावा, असं मनसेनं म्हटलं आहे. शिवाजी पार्क आणि पार्ल्यात मनसे नागरिकांना वायफायची सेवा देत आहे असं मनसेचे मुंबई महापालिकेतले गटनेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मनसेचा प्रकल्प प्रगतीपथावर असून येत्या 10 दिवसांत शिवाजी पार्कमधला प्रकल्प पू्र्‌णत्वास येईल असं त्यांनी म्हटलं आहे तर आम्ही वचननाम्यातलं आश्वासन पूर्ण केलंय, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी IBN लोकमतशी बोलताना म्हटलं आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: