• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • विषारी इंजेक्शन देऊन केला जातोय झाडांचा खून

विषारी इंजेक्शन देऊन केला जातोय झाडांचा खून

  • Share this:

मुंबई - 05 जुलै : महाराष्ट्रात एकीकडे झाडं लावण्याची मोहीम सुरू झालीय पण दुसरीकडे मात्र झाडांच्या मारेकर्‍यांची एक टोळीच झाडं मारण्याचे कारनामे करतेय. या टोळीतले गुन्हेगार झाडं तोडत नाहीत तर झाडांना विषारी इंजेक्शन देऊन झाडांचा अक्षरश: खून करतात.tree_injection

मुंबई नगरीतलं हे आहे एक धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज हाती आलंय. रात्रीच्या अंधारात एक टोळी बाईकवरून येते आणि झाडांना विषारी इंजेक्शन देऊन काही सेकंदात पसार होते. हे लोक हे कारनामे इतक्या बेलामूमपणे करतात की परिसरातल्या रहिवाशांना आणि कुणालाच काही पत्ताही लागत नाही. काही आठवड्यांनी जेव्हा हे झाड पूर्ण कोमजून जातं तेव्हा लोकांच्या लक्षात येतं. मुंबईत दहिसरमध्ये अशाच प्रकारे झाडांना इंजेक्शन देण्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये पकडला गेला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: