17 मार्च : डॉ. विजयकुमार गावित मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हिना गावित भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
डॉ. हिना गावित विजयकुमार गावितांची मुलगी आहे. गावित यांची मुलगी हिना गावित ह्या नंदुरबार लोकसभेसाठी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या पहिल्या यादीत हिना गावित यांचं नाव जाहीरही झालं होतं. पण काही कारणास्तव ते मागे घेण्यात आलं.
जाहिरात
हिना गावित जर भाजपकडून निवडणूक लढवणार असतील तर विजयकुमार गावित यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. याविषयीचा निर्णय त्यांनी भाजपला कळवणं अपेक्षित आहे. तर विजयकुमार गावित मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार झाले असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांकडून मिळतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.