भिवंडी - 17 मे : आरपीआय कार्यकर्ता विकी ढेपे या दलित तरुणाचा खून प्रकरणी स्थानिक रहीवाश्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज विकी ढेपेच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्तही होता.
आज दुपारी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी विकी ढेपेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. भिवंडी पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांना भिवंडी न्यायालयाने 23 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, आरोपी राजू चौगुले हा स्थानिक भाजप आमदाराचा भाऊ असून रवी सावंत हा भाजपचा पदाधीकारी आहे. हे दोन प्रमुख आरोपी मात्र अजूनही फरार आहेत. त्यांना कधी अटक होणार असा प्रश्नं स्थानिक रहिवासी विचारत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

)







