27 जानेवारी : लैंगिक अत्याचार प्रकरणी मेघालयचे राज्यपाल व्ही. षण्मुगनाथन यांना पायउतार व्हावं लागलंय. त्यांच्याजागी आता आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे मेघालयचा कार्यभार सोपवण्यात आलाय.
षण्मुगनाथन यांच्याविरोधात मेघालयच्या राजभवनातल्या शंभर कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती. राजभवनाच्या प्रतिष्ठेला षण्मुगनाथन यांच्यामुळे बट्टा लागल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी पत्रात केला होता. पीआरओची नोकरीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. शिवाय राजभवनातल्या कर्मचाऱ्यांशी असभ्य वागत असल्याचीही कर्मचाऱ्यांची तक्रार होती. कर्मचाऱ्यांच्या लेटरबॉम्बनंतर षण्मुगनाथन यांनी राजीनामा दिला होता. हा राजीनामा आता स्वीकारण्यात आलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv