जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका - नाना पाटेकर

लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका - नाना पाटेकर

लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका - नाना पाटेकर

03 ऑक्टोबर : उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट असताना पाक कलाकारांची पाठराखण करणाऱ्या सलमान खानला नाना पाटेकरांनीही फटकारलं आहे. आपले खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना उगाच महत्त्व देऊ नका, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी नाव न घेता सलमान खानला टोला हाणला. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर नानांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सगळ्यात आधी देश, त्यानंतर आम्ही कलाकार, कलाकारांची किंमत देशासमोर शून्य असते. ज्यांची लायकी नाही त्यांना महत्व देऊ नका.

  • -MIN READ
  • Last Updated :

    nana_patekar 03 ऑक्टोबर :  उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट असताना पाक कलाकारांची पाठराखण करणाऱ्या सलमान खानला नाना पाटेकरांनीही फटकारलं आहे. आपले खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. त्यामुळे लायकी  नसणाऱ्यांना उगाच महत्त्व देऊ नका, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी नाव न घेता सलमान खानला टोला हाणला. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर नानांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सगळ्यात आधी देश, त्यानंतर आम्ही कलाकार, कलाकारांची किंमत देशासमोर शून्य असते. ज्यांची लायकी नाही त्यांना महत्व देऊ नका. आपले खरे हिरो जवान आहेत. आम्ही नकली लोक आहोत, आम्हाला इतकं महत्त्व देऊ नका, असंही नाना म्हणाले आहे. सलमाननं पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा दिलेला नाही. त्यामुळं त्याने त्याबाबत बोलूच नये असं नानानं म्हटल आहे. पाकिस्तानी कलाकारांची घरवापसीचं नानानं समर्थन केलं आहे.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात