जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / रामविलास पासवान भाजपच्या उंबरठ्यावर

रामविलास पासवान भाजपच्या उंबरठ्यावर

रामविलास पासवान भाजपच्या उंबरठ्यावर

26 फेब्रुवारी : देशभरात भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची लाट दिसत असून आता या लाटेत लोकजनशक्ती पक्ष स्वार होणार आहे. रामविलास पासवान यांनी अखेर भाजपशी युती करणार, हे जवळपास निश्चित झालंय. लोकजनशक्ती पक्षाच्या संसदीय मंडळाची आज बैठक झाली. पण, भाजपबरोबर युतीची स्पष्ट घोषणा करण्यात आली नसली. तरी तसे स्पष्ट संकेत पासवान यांनी दिले आहे. आरजेडीबरोबर गेले अनेक दिवस मतभेद आहेत आणि काँग्रेसही प्रतिसाद देत नाहीय. त्यामुळे आमच्यासमोर कुठलाच पर्याय उरलेला नाही, असं रामविलास पासवान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    ram vilas paswan 26 फेब्रुवारी : देशभरात भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची लाट दिसत असून आता या लाटेत लोकजनशक्ती पक्ष स्वार होणार आहे. रामविलास पासवान यांनी अखेर भाजपशी युती करणार, हे जवळपास निश्चित झालंय. लोकजनशक्ती पक्षाच्या संसदीय मंडळाची आज बैठक झाली.

    पण, भाजपबरोबर युतीची स्पष्ट घोषणा करण्यात आली नसली. तरी तसे स्पष्ट संकेत पासवान यांनी दिले आहे. आरजेडीबरोबर गेले अनेक दिवस मतभेद आहेत आणि काँग्रेसही प्रतिसाद देत नाहीय. त्यामुळे आमच्यासमोर कुठलाच पर्याय उरलेला नाही, असं रामविलास पासवान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.

    जाहिरात

    यासंदर्भात रामविलास पासवान लवकरच अधिकृत घोषणा करतील. रामविलास पासवान उद्या (गुरुवारी) दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजपनं लोक जनशक्ती पक्षाला 8 जागा देण्याची तयारी दाखवलीय. त्यामुळे गेले अनेक दिवस जी चर्चा सुरू होती ती अखेर खरी ठरलीय. रामविलास पासवान यांनी लालूंची साथ सोडत आपला जुना सोबती असलेल्या भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. 2002 च्या गुजरात दंगलींनंतर रामविलास पासवान एनडीएमधून बाहेर पडले होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात