01 ऑगस्ट : बेळगावातल्या येळ्ळूरमधल्या मराठी भाषकांवर कर्नाटक पोलिसांनी केलेला लाठीमार ही गंभीर घटना असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारपर्यंत नवीन याचिका दाखल करावी आणि त्यासोबत मारहाणीसंदर्भातील पुरावेही कोर्टासमोर सादर करावे असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहे. त्यामुळे कर्नाटक पोलिसांना मराठी भाषिकांवरच्या लाठीमार भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मराठी भाषिकांचे गाव महाराष्ट्रात सामील करावे या संदर्भात महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात 2004 साली याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (शुक्रवारी) सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टासमोर येळ्ळूरमधील कर्नाटक पोलिसांच्या मराठी भाषकांच्या घरात घुसून लाठीमार केल्याचा मुद्दा उपस्थित केला. सुप्रीम कोर्टानेही याची दखल घेत समितीच्या नेत्यांना नवीन याचिका दाखल करायला सांगितले आहेत तर महाराष्ट्र सरकारला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++