31 जुलै : 257 लोकांचा बळी घेणार्या 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं. अपेक्षेप्रमाणे अंडरवर्ल्डमध्ये याचे पडसाद उमटले. याकूब मेमनला देण्यात आलेली फाशीची शिक्षा बेकादेशीर आहे, याकूबला फाशी देऊन त्याची कायदेशीररित्या हत्या केली असा उवाच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकील याने केलाय. एवढंच नाहीतर याकूबच्या फाशीच्या आपण बदला घेऊ, याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी छोटा शकीलने दिलीय.
याकूबला फासावर लटकवण्यात आल्यामुळे छोटा शकीलने एका इंग्रजी दैनिकाला फोनवरून मुलाखत दिली. शकील म्हणतो, याकूबला फाशी दिली यावरून आता भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि भारत सरकारवरुन विश्वास उडालाय. जर दाऊद सुद्धा शरण आला असता तर त्याच्यासोबत पण हेच झालं असतं. टायगर मेमन च्या कृत्याची शिक्षा सरकारने एका निर्दोष व्यक्तीला दिलीये. याचे परिणाम भोगावे लागणार आहे. आता यापुढे सरकारने चॉकलेट दाखवलं तर त्यावर विश्वास ठेवणार नाही.
‘तुमच्याच लोकांवर विश्वास नाही’
शकील पुढे म्हणतो, टायगर मेमनने बॉम्बस्फोटाच्या कटात कसा सहभागी होता याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. पण, अशा व्यक्तीला याची शिक्षा मिळाली ज्याने या प्रकरणाचे ऑडिओ-व्हिडिओ पुरावे सोबत नेले होते. याकूब दुसर्या आरोपींशी सहमत नव्हता त्यामुळे त्याने कायद्याचं पालन करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचा मोबदला काय मिळाला ?, तुम्ही लोकं तुमच्याच माणसांवर विश्वास ठेवत नाही. दिल्लीतील एका पोलीस अधिकार्यांने याकूबचा यात सहभाग नाही असा दावा केला होता. पण, त्याचं मत ग्राह्य धरण्यात आलं. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.
फाशी देऊन काय साधलं ? या मुलाखतीत शकीलने याकूबची जोरदार पाठराखण केली. याकूबच्या कुटुंबीयांना दुबईचा व्हिसा मिळाला होता. त्याने आपल्या कुटुंबाला बोलावले आणि त्यानंतर तो शरण आला. पण त्याने हे कशासाठी केलं ?, तुम्ही लोकांनी काय साध्य केलं ?, कुणी काय केलं आणि त्याची शिक्षा कुणाला मिळाली. याकूब मानसिक दृष्ट्या आजारी होता. तरी त्याला शिक्षा दिली. त्याच्या आईलाही शिक्षा दिली. ज्यांनी गुन्हा केलाय त्याला बोलवून फाशी द्या असा संतापही शकीलने व्यक्त केला. याकूब दाऊदचा माणूस नव्हता कुणीतरी सरकारवर विश्वास ठेवला होता पण त्याला धोका देण्यात आला. ‘कंपनी’ला सरकारवर विश्वास नाहीये. आता भारतात मरण्यासाठी कोण येणार ?, याकूब आपल्या पत्नी आणि मुलासोबत भारतात परतला होता. आणि त्याच महिन्यात त्याला शेवटपर्यंत जेलमध्ये राहावं लागलं. जो शरण आला त्याबद्दल हाच न्याय आहे का ?, त्याने मदत केली पण सरकारने काय केलं ?, याकूब हा दाऊदचा माणूस होता असा आरोप केला पण तो दाऊदचा माणूस नव्हताच असा दावाही शकीलने केला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++