07 ऑगस्ट : याकूब मेमनची फाशीची शिक्षा कायम ठेवणारे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना आज (शुक्रवारी) अज्ञात व्यक्तीकडून धमकीचं पत्र आलं आहे. मिश्रा यांच्या घराबाहेर धमकीचे पत्र मिळाले असून या पत्रात ‘आम्ही तुम्हाला सोडणार नाही’ अशा धमकी देण्यात आली आहे. या पत्राच्या पार्श्वभूमीवर दीपक मिश्रा यांच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली असून, दिल्ली पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली असून दिल्ली पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे.
याकुब मेमनला गेल्या महिन्यात 30 तारखेला नागपूरमधील कारागृहात फासावर लटकवण्यात आलं होतं. याकूब मेमनची शेवटची फेरविचार याचिका आणि मध्यरात्री दाखल करण्यात आलेली याचिका अशा दोन्ही याचिकांची सुनावणी दीपक मिश्रा यांच्या खंडपीठापुढे झाली होती. याकूबच्या या दोन्ही याचिका मिश्रा यांच्या खंडपीठानं फेटाळून लावल्या होत्या. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर लगेचच दीपक मिश्रा यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे, टाडा कोर्टाचे न्यायाधीश प्रमोद कोदे यांनाही जीव मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती आता समोर येत आहे. 1993 च्या बाँम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीच्या वेळी ते टाडा कोर्टाचे न्यायाधीश होते. याबाबत मुंबई पोलिसांनी कोणतीही माहिती द्यायला नकार दिला असून ही बातमी चुकीची असल्याचंही मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. पण न्यायाधीश कोदे यांच्या कुटुंबियांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोदे यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. याकूब मेमनच्या फाशीनंतर न्या. कोदे यांच्या सुरक्षेतही यापूर्वीच वाढ करण्यात आली होती. यानंतर त्यांना मिळालेल्या धमकीनंतर पोलीस विशेष दखल घेताना दिसत आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++