जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / यंदाच्या बजेटमध्ये स्वच्छतागृहांसाठी तरतूद करणार का?

यंदाच्या बजेटमध्ये स्वच्छतागृहांसाठी तरतूद करणार का?

यंदाच्या बजेटमध्ये स्वच्छतागृहांसाठी तरतूद करणार का?

प्रणाली कापसे, मुंबई 22 फेब्रुवारी : मुंबई लोकल ही देशात सर्वाधिक उत्पन्न देणारी रेल्वेसेवा आहे. त्याचवेळी रेल्वेच्या अपघातात सर्वात जास्त मरण पावणार्‍यांची संख्याही मुंबईत सर्वात जास्त आहे. याला जबाबदार आहे रेल्वेची उदासीनता. लोकलच्या रुळाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयं नसल्यानं तिथले नागरिक रेल्वे ट्रॅकवर शौचाला जातात आणि आपल्या जीवाला मुकतात. मुंबईतली 65 टक्के लोकसंख्या झोपडट्टीमध्ये राहते. त्यापैकी बहुतेक झोपड्यांमध्ये शौचालयं नाहीत, या माहितीमध्ये नवीन काही नाही. या झोपडपट्टीतल्या रहिवाशांपैकी अनेक जण लोकलच्या ट्रॅकवर शौच्यासाठी जातात, हे देखील सर्वांना माहित असलेलीच गोष्ट.

  • -MIN READ
  • Last Updated :

    प्रणाली कापसे, मुंबई 22 फेब्रुवारी : मुंबई लोकल ही देशात सर्वाधिक उत्पन्न देणारी रेल्वेसेवा आहे. त्याचवेळी रेल्वेच्या अपघातात सर्वात जास्त मरण पावणार्‍यांची संख्याही मुंबईत सर्वात जास्त आहे. याला जबाबदार आहे रेल्वेची उदासीनता. लोकलच्या रुळाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयं नसल्यानं तिथले नागरिक रेल्वे ट्रॅकवर शौचाला जातात आणि आपल्या जीवाला मुकतात. मुंबईतली 65 टक्के लोकसंख्या झोपडट्टीमध्ये राहते. त्यापैकी बहुतेक झोपड्यांमध्ये शौचालयं नाहीत, या माहितीमध्ये नवीन काही नाही. या झोपडपट्टीतल्या रहिवाशांपैकी अनेक जण लोकलच्या ट्रॅकवर शौच्यासाठी जातात, हे देखील सर्वांना माहित असलेलीच गोष्ट. मात्र, यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो हे मात्र फारसं कोणाला माहित नाही. onethirdofwo मुंबईत दरवर्षी साडेतीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा लोकल अपघातात मृत्यू होतो. हा आकडा जगात सर्वात जास्त आहे. यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना अपघातात मरण पावणार्‍यांची संख्या सर्वात जास्त आहे. झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयं कमी, त्यामुळे नैसर्गिक विधीसाठी रेल्वे रूळावर जाणार्‍यांची संख्या बरीच आहे. रेल्वे रुळावर कुंपणं नसतात. त्यामुळे तिथं सहज जाता येतं आणि अपघातांची संख्याही वाढते. रेल्वे प्रशासनाच्या एवढ्या मोठ्या बजेटमध्ये आजही संरक्षक भिंतींसाठी किरकोळ निधी ठेवला जातो. एकीकडे स्वच्छ भारत अभियान हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडता कार्यक्रम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने झोपडपट्टी परिसरात आणि रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात शौचालयं बांधली, आणि त्यांची स्वच्छता ठेवली तर हे हकनाक जाणारे बळी थांबतील.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात