जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मुंबईत पावसाचा जोर कायम, लोकलची गती मंदावली

मुंबईत पावसाचा जोर कायम, लोकलची गती मंदावली

मुंबईत पावसाचा जोर कायम, लोकलची गती मंदावली

16 जुलै : मुंबईत काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर बुधवारी सकाळीदेखील कायम असलेला पाहायला मिळत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे महापालिकेची दुरवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे. पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवरही दिसायला सुरुवात झाली आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या सध्या 15 ते 20 मिनिटांच्या उशिराने धावत आहेत. मुंबईतल्या भायखळ्यातील लव्हलेन, बीआयटी चाळ, वरळी बीडीडी चाळ, लालबाग, परळ, हिंदमाता, मिलन सबवे, खार सबवे या सखल भागांत पाणी साचलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :
    mumbai_rain

    16  जुलै : मुंबईत काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर बुधवारी सकाळीदेखील कायम असलेला पाहायला मिळत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे महापालिकेची दुरवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे. पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवरही दिसायला सुरुवात झाली आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या सध्या 15 ते 20 मिनिटांच्या उशिराने धावत आहेत. मुंबईतल्या भायखळ्यातील लव्हलेन, बीआयटी चाळ, वरळी बीडीडी चाळ, लालबाग, परळ, हिंदमाता, मिलन सबवे, खार सबवे या सखल भागांत पाणी साचलं आहे. या ठिकाणी महापालिकेने मोटरपंपांची व्यवस्था केली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे रुळांवर आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.

    जाहिरात

    दरम्यान, आज दुपारी 3.13 मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून 4.83 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर अजून काही काळ कायम राहिल्यास भरतीच्या काळात महापालिकेने मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. रायगड : जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर कायम आहे. मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. कर्जत, माथेरान, खोपोली, उरण, पोलादपूर, म्हसळा भागात पावसाचा जोर आहे. कर्जतहून सीएसटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरू आहे तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आतापर्यंत कर्जत 88.8 मिमी, माथेरान 107 मिमी, उरण 160 मिमी, पोलादपूर 110 मिमी, श्रीवर्धन 86 मिमी, रोहा 67, महाड 79 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी : जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू असून वसिष्ठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासांत 418 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले 10 बंधारे पाण्याखाली गेलेत. राधानगरी, काळम्मावाडी धरणक्षेत्रांत तुफान पाऊस झाला आहे. चंद्रपूर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका चिमूर तालुक्याला बसला आहे. गेल्या 24 तासांत चिमूरमध्ये सर्वाधिक 235 मिमि पाऊस झाला आहे. काल 24 तासांत पडलाय. उमा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं काल रात्रीपर्यंत चिमूर-चंद्रपूर, चिमूर-हिंगणघाट आणि चिमूर-नागपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक रात्री उशिरापर्यंत बंद होती. रस्ता बंद झाल्यानं अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडले होते. कारपाटा, केसलापार, सिरपूर अशा अनेक गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटला होता. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात