03 जुलै : मागील लोकसभेच्या निवडणुकीला मी आठ कोटी रूपये खर्च केले कुणाला काय तक्रार करायची ती करा अशी जाहीर कबुली देणारे भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना अखेर आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखांची असताना मुंडेंनी ही नोटीस मिळाल्याचंही समजतंय. गोपीनाथ मुंडे भाजपचे जेष्ठ नेते…गुजरात मुख्यमंत्री आणि प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित मुंडेंनी गेल्या निवडणुकीत आठ कोटी रूपये खर्च केल्याची जाहीर कबुली दिली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विरोधकांनी संधीसाधत मुंडेंची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीच केली तर त्यांच्या विधानाची दखल घेत आता निवडणूक आयोग मुंडेंना नोटीस पाठवणार आहे. नियमांप्रमाणे कोणताही उमेदवार 40 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे प्रचारासाठी खर्च करू शकत नाही. पण मुंडेंनी स्वतःच नियम तोडल्याचं मान्य केल्यामुळे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मुंडेंच्या भाषणाची सीडी आयोग बघणार असून त्यानंतरच कारवाई करण्याबाबत निर्णय होणार आहे. मुंडेंच्या या वक्तव्यावर टीका करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं चैकशीची मागणी केलीये. तर आम आदमी पार्टीनंही मुंडेंच्या इन्कम टॅक्स चौकशीची मागणी केलीय. आपण एकूणच वाढणार्या खर्चाबद्दल बोललो, निवडणूक आयोगानं विचारणा केल्यास उत्तर देवू असं आव्हानच मुंडेंनी यांनी दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.








