25 फेब्रुवारी : केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधानं करून अडचणीत आलेत. त्यांनी मीडियासंदर्भात यांनी मीडियावर केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली होती. त्या वादग्रस्त विधानावर शिंदे यांनी स्पष्टीकरण देत, माझं वक्तव्य सोशल मिडीयासंदर्भात होतं, असं शिंदेंचं म्हणणं आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडियामधील काही लोक बसल्या बसल्या थुकपट्टी लावण्याचं काम करत आहे. मध्यंतरीच्या काळाच मीडियातील काही मंडळींनी काँग्रेसविरोधात अप्रचाराची मोहिम उघडली होती अशा प्रवृत्तींना ठेचून काढलं जाईल, अशी धमकीच शिंदे यांनी काल सोलापूरमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात दिली होती.
रविवारी एका सभेत बोलताना सुशीलकुमार यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना लक्ष्य केले होते व त्यांना चिरडून टाकू असेही म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर माध्यमांकडून जोरदार टीका झाल्यानंतर, त्यांनी सारवासारव करत आपण सोशल मिडीयाबद्दल असे म्हटल्याचे म्हटले आहे.
सुशीलकुमार म्हणाले, ‘कर्नाटक आणि हैदराबादमध्ये ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याने मी सोशल मिडीयाबद्दल असे वक्तव्य केले होते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना चिरडून टाकण्याचे वक्तव्य मी कधीच केलेले नाही.’ असं शिंदेंचं म्हणणं आहे.