29 नोव्हेंबर : शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी पैसे देण्यास साई संस्थानाने नकार दिला आहे. साई संस्थानाची एक हजार कोटींची विकासकामं प्रलंबित असल्यामुळे विमानतळासाठी 100 कोटी देणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
शिर्डी विमानतळाचे काम गेल्या पाच वर्षांपासुन सुरू आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी साई संस्थानानं 110 कोटी रुपये द्यावेत असा प्रस्ताव राज्य सरकारने मांडला होता. राज्यसरकारच्या या प्रस्तावाची बातमी काल (शनिवारी) आयबीएन लोकमतने दाखवली होती. साई मंदिर संस्थानाच्या पदाधिकार्यांनी झालेल्या बैठकीत पैसे न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी विमानतळासाठी साई संस्थानाने राज्य सरकारला 50 कोटींची मदत केली होती. मात्र साई संस्थानाच्या तिजोरीतून विमानतळासाठी नवा रुपया देण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. शिर्डीमध्ये मुलभूत सुविधांची वानवा असताना विमानतळासाठी उधळपट्टी कशासाठी, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. भक्तांसाठी कुठल्याही सोयीसुविधा नाहीत, रस्त्यांची वाईट परिस्थीती आहे. त्याकडे लक्ष न देता केवळ विमानाने येणार्या मुठभर श्रीमंतासाठी राज्य सरकार पायघड्या घालत असल्याची शिर्डीकरांच्या भावनांचा विचार करून हा प्रस्ताव संस्थानानं फेटाळला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++