28 जुलै : आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. पंजाबमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीवर पक्षाला आपलं लक्ष केंद्रीत करायचं असल्याने महाराष्ट्रात निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय पक्षानं घेतला असल्याचंही केजरीवाल यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत ‘आप’चा दारुण पराभव झाला होता. देशभरातल्या निवडणुकीच्या अनेक जागा लढवूनही पक्षाला अवघ्या चार जागा जिंकता आल्या. राज्यातल्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची होती, पण आता अजून नुकसान नको, अशी पक्षाची भूमिका असल्याचं समजतं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++