21 नोव्हेंबर : नोटबंदीच्या मुद्यावर शिवसेना नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात गेलीय. या मुद्द्यावरून सरकारवर सडकून टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहिले. यावेळीही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. मुंबई मराठी माणसाला रक्त सांडून मिळालीय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कुलाब्याच्या सांडपाणी निस्सारण प्रकल्पाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं.
मुंबई महापालिका निवडणुकांचं वातावरण तापायला लागलंय. गेल्या तीन दिवसात मुंबईत तीन मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्यात. राज ठाकरे, शरद पवार यांच्यानंतर आज उद्धव ठाकरेंनीही सभा घेतली. उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणात मराठी माणसाचा मुद्दा, मुंबईची सत्ता यावर टीकाटिप्पणी केली. महापालिकेचे जे भ्रष्ट अभियंते आहेत त्यांच्यामुळेच महापालिका बदनाम झाली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

)







