03 जुलै : भीमाशंकर अभयारण्यात होतेय शेकडो झाडांची कत्तल हात असल्याची धक्कादायक माहिकी पुढे आली आहे. पुण्याच्या मुक्तानंद ऍग्रो फार्मसी लिमिटेड या कंपनीसाठी झाडांची हत्या करण्यात येत असल्याचं आरोप इथल्या गावकर्यांनी केला आहे.
भीमाशंकर अभयारण्यात रस्त्यांची कामं आणि बांधकामांसाठी सर्रास बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. तेही कोणतीही परवानगी न घेता. पुण्याच्या मुक्तानंद ऍग्रो फार्मसी लिमिटेड या कंपनीनं अभयारण्यातली 1600 एकर जागा विकत घेतली आहे. हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या इको सेन्सेटिव्ह झोन अंतर्गत येत असल्यामुळे खासगी जागेतही झाडांची कत्तल करण्यास इथे मनाई आहे. त्याशिवाय जी जागा कंपनीने विकत घेतली आहे, त्याच्या मध्यभागी गावकर्यांची जमीन आहे. पण कंपनी गावकर्यांना आपल्या जमिनीकडे जाण्यासाठीचा रस्ता वापरू देत नाही. त्याचबरोबर इथे गौण खनिज आणि मुरूम चोरीला जातं असल्याचा आरोप इथले गावकरी करत आहेत. 14 हजार ब्रासपेक्षा जास्त मुरूम आतापर्यंत चोरीला गेल्यांचं समजतंय.
दरम्यान, या जागेची तहसीलदारांनी पाहणी केली असून जागेची राखण करण्यासाठी त्यांनी एका साधूची नियुक्ती केली. पण हा साधूच आता स्थानिक लोकांना धमकवत, असल्याचा आरोप होतं आहे. आता येत्या रविवारी तहसीलदारांनी कंपनीला आपलं म्हणणं मांडण्यासाठी बोलावलं. जर दोषी आढळली तर कंपनीला कमीतकमी 50 लाखांचा दंड होऊ शकतो.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++