16 मे : भिंवडीतील आरपीआयचा कार्यकर्ता विकी ढेपे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज (सोमवारी) निषेध मोर्चा काढण्यात आला. सर्व दलित संघटनांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून भिवंडी कडकडीत बंद पुकारला होता. स्थानिक भाजप आमदार महेश चौघुले यांनी ही हत्या घडवून आणल्याचा आरपीआयचा आरोप आहे. त्यापार्श्वभूमीवर विकीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना तातडीने अटक करा आणि तसंच चौघुले यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागमी अंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
भाजपचे आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांनी मंगळवारी मध्यरात्री वराळदेवीनगर इथल्या दलित वस्तीत घुसून 3 दलित तरुणांवर प्राणघातक हल्ला केला होती. या हल्ल्यात विकी ढेपे या तरुणाचा रविवारी दुपारी जे.जे रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त आरपीआय कार्यकर्त्त्यांनी आज प्रांत कार्यालयासमोर धडक मोर्चा काढला होता. मोर्चा काढताना भाजपचे ब्यानर रोडवर दिसताच ते बनर फाडून त्यावर दगडफेक सुध्दा करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

)







