**06 ऑक्टोबर :**भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली असतानाच आता डाळींच्या किंमतीही 200च्या घरात पोहचले आहेत. तुरडाळीची किंमत 200 रूपये किलो झाल्याने सर्वसामान्यांच्या घरातून डाळभात गायब झाला आहे. तुरडाळीच्या किंमतीबरोबर इतर डाळींच्या किंमतीही वाढल्या आहेत. यामध्ये मुग डाळ 150 ते 170 , चना डाळ 80 ते 100, उडीत डाळ 160 ते 170 मसुर डाळ 100 ते 110 रूपये किलोनो विकल्या जात आहेत. महाराष्ट्रातील लातूर, सोलापूर , मराठवाडा भागातून डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी पाऊस नसल्याने दुष्काळाची गडद छाया पसरली असून, अवकाळी आणि दुष्काळाने डाळींचं उत्पादन घटलं आहे. त्यामुळे डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. दरम्यान, नविन पिक जानेवारी महिन्यात येण्याची शक्यता असल्याने अजून तीन महिने डाळींच्या किंमती वाढलेल्या असतील असी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++