जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / भाजपची रणनीती, मतांच्या ध्रुवीकरणासाठी 'बिनधास्त'बोला?

भाजपची रणनीती, मतांच्या ध्रुवीकरणासाठी 'बिनधास्त'बोला?

भाजपची रणनीती, मतांच्या ध्रुवीकरणासाठी 'बिनधास्त'बोला?

अमेय तिरोडकर, नवी दिल्ली 21 एप्रिल : निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू झालंय. विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. राजकोटमध्ये हिंदु बहुल वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा असं विधान तोगडियांनी केलंय. तोगडियांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे. काँग्रेसनंही याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. भाजपनं स्वत:ला या वक्तव्यापासून दूर केलं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तोगडियांची पाठराखण केलीय. ध्रुवीकरणाच्या राजकारणावरचा हा रिपोर्ट…

  • -MIN READ
  • Last Updated :

    praveen togadia giriraj singh अमेय तिरोडकर, नवी दिल्ली

    21 एप्रिल : निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू झालंय. विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. राजकोटमध्ये हिंदु बहुल वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा असं विधान तोगडियांनी केलंय. तोगडियांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे. काँग्रेसनंही याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. भाजपनं स्वत:ला या वक्तव्यापासून दूर केलं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तोगडियांची पाठराखण केलीय. ध्रुवीकरणाच्या राजकारणावरचा हा रिपोर्ट…

    जाहिरात

    भाजपचे उत्तर प्रदेशातले नेते गिरीराज सिंह यांच्या या वक्तव्यावरून उठलेलं वादळ शमतं न शमतं तोच विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडिया यांच्या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत आलीय. गिरीराज यांनी मोदींना विरोध करणार्‍यांना पाकिस्तानात पाठवण्याची भाषा केली तर हिंदूबहुल भागात मुस्लिमांना मालमत्ता घेऊ देऊ नका, असं तोगडिया गुजरातमधल्या राजकोटमध्ये म्हणाले.

    तोगडिया आणि मोदी यांच्यात कधीच सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत. एकीकडे मोदी विकासाच्या नावावर देशभर मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. हिंदुत्त्वाच्या परिघाबाहेर असलेल्या मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी तोगडिया यांनी हे वक्तव्य केलंय. भाजपनं ताबडतोब या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मात्र तोगडिया यांची पाठराखणच केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्य प्रदेशात मालवा भागात पत्रकं वाटून मतदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

    हिंदूमधली ओबीसी आणि दलितांची मतं धार्मिक ध्रुवीकरणामुळेच भाजपसोबत येऊ शकतात, हा आजवरचा इतिहास आहे. तसं झालं नाही तर ही मतं ठिकठिकाणच्या भाजपविरोधी ताकतवान पक्षांना एकगठ्ठा पडतात. म्हणून, ठराविक नेत्यांकडून वारंवार ध्रुवीकरणासाठीची विधानं केली जाणं, ही भाजपच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातली रणनीती आहे, असं म्हटलं जातंय.

    भाजप आणि परिवाराच्या आक्रमक हिंदुत्त्वाच्या इतिहास - 1984 : राम मंदिराचं कुलूप उघडावं, यासाठी विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केलं - 1989 : भाजपने पालमपूरमधल्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच राम मंदिराचा मुद्दा राष्ट्रीय अजेंड्यावर स्वीकारला - 1990 : भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रामजन्मभूमी आंदोलनाचा मुद्दा व्यापक बनवण्यसाठी पहिली रथयात्रा काढली - 6 डिसेंबर 1992 : बाबरी मशीद विध्वंस - 25 डिसेंबर 1998 : हिंदू धर्म जागरण मंच या विश्व हिंदू परिषदेच्या संलग्न संघटनेकडून गुजरातमधल्या डांग जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनरींवर आणि तिथल्या शाळेवर मोर्चा काढला आणि नंतरच्या आठच दिवसांत तोडफोड केली. - 1998 : याच वर्षी भाजपप्रणित एनडीए शालेय अभ्यासक्रमांमध्ये हिंदुत्ववादी विचारांची मांडणी करत असल्याचा वाद उफाळला. देशभरातल्या मान्यवर इतिहास संशोधकांनी याचा निषेध केला, आंदोलनंही झाली. - 22 जानेवारी 1999 : ग्रॅहम स्टेन्स या ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन मिशनर्‍याची ओडिशामधल्या दारा सिंग या बजरंग दलाशी संबंधित मूलतत्त्ववाद्याकडून जाळून हत्या करण्यात आली. - फेब्रुवारी -मार्च 2002 : गुजरातमध्ये हिंदू-मुस्लीम दंगल भडकावण्याचा काही भाजप नेते, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांवर आरोप करण्यात आले. - मार्च 2002 : कोर्टाची परवानगी नसताना अयोध्येत शीलादानाचा प्रयत्न - 2008 : महाराष्ट्रात मालेगावात हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बॉम्बस्फोट घडवण्यात आले. नंतर मालेगाव, हैदराबाद, अजमेर आणि समझौता एक्सप्रेसमधलेस्फोट याच असीमानंद आणि ग्रुपने घडवल्याचे एनआयए तपासात उघड झालं. सध्या त्यातल्या अनेक आरोपींवर ठिकठिकाणच्या कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलेत. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: RSS , sangha , VHP
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात