24 डिसेंबर :आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात कारवाई करायला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने आज राज्यपालांकडे केलीय.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. सीबीआयने अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांकडे परवानगी मागितली होती. पण, राज्यपालांनी ती नाकारली. त्यानंतर आज विनोद तावडे यांनी राज्यपालांना पत्र लिहून फेरविचार करावा, अशी मागणी केली.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.