चंद्रपुर - 13 मार्च : एकीकडे पाकिस्तान अतिरिकी देशात घुसवत असताना त्याचवेळेस त्यांच्या हातात बॉल देणं हे योग्य नाही. बॉल आणि बॉम्ब एकाचवेळी चालणार नाही, असा इशारा देत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भारत-पाक सामन्यावरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र केली.
चंद्रपुर जिल्ह्यात भद्रावती नगरपरिषदेतर्फे नागपूर विभाग स्तरीय नगराध्यक्ष सुवर्ण चषक क्रीडा स्पर्धा तथा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झालं. त्यावेळी त्यांनी अतिरेकी देशात घुसविणार्यांशी खेळायचं कसं, असा प्रश्न उपस्थित केला.
हिमाचल प्रदेश सरकारने भारत-पाक सामना नाकारल्याने देश भावना दाखविली. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पण, दुसरीकडे पश्चिम बंगाल सरकारने आगामी निवडणूक लक्षात घेऊन मतांचे राजकारण करत होकार दिल्याची टीकाही त्यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

)







