16 ऑगस्ट : ‘तहलका’ या प्रसिद्ध साप्ताहिकामध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दहशतवादी म्हटल्याने नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. तहलकाच्या नव्या अंकात सर्वात मोठा दहशतवादी कोण? हा लेख छापून आला आहे. या लेखात दहशतवाद्यांसोबत शिवसेनाप्रमुखांचाही फोटो प्रसिद्ध केलाय. या लेखाचा तीव्र निषेध करीत मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ‘तहलका’विरोधात तक्रार दाखल केली आहे.
‘तहलका’च्या ताज्या अंकात ‘हु इज द बिगेस्ट टेररिस्ट’, या शिर्षकाखाली हा लेख छापण्यात आला आहे. यामध्ये दहशतवाद्यांच्या यादीत दाऊद इब्राहिम, याकूब मेमन, भिंद्रनवाले यांच्यासह चक्क बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे. याकूब मेमनच्या फाशीमुळे दहशतवाद्यांना कठोर संदेश दिल्याचं बोललं जातं आहे. त्याचं विश्लेषण करताना मुंबईत घडलेल्या दंगलीसाठी जबाबदार कोण, असा सवाल या अंकात विचारला आहे.
सध्या शिवसेनेनं यावर आपली कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. केंद्र सरकारने तात्काळ दखल घेऊन मॅथिव साम्युअल या त्यांच्या पत्रकाराला अटक करावी, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केलीये. यापुढे आपण राज्य सरकार तसंच केंद्रातल्या गृहमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++