18 जून : अभिनेत्री प्रीती झिंटा आणि उद्योगपती नेस वाडिया यांच्यातल्या वादाला नवं वळण लागलंय. नेस वाडियांचे वडील नस्ली वाडियांना अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याची तक्रार वाडिया ग्रुपनं मुंबई पोलिसांकडे केली आहे. प्रीती झिंटाला त्रास देऊ नका, अशा धमकीचा फोन नस्ली वाडिया यांच्या सेक्रेटरीला अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीकडून गँगकडून आल्याचं वाडियांचं म्हणणंय. नस्ली वाडियांनी प्रीती झिंटा आणि नेस वाडियाच्या वादात पडू नये, अशी धमकी दिल्याचीही माहिती कळतेय. नस्ली वाडिया यांनी याप्रकरणी लेखी तक्रार दाखल दिली आहे. ही तक्रार खंडणीविरोधी पथकाकडे पाठवण्यात आली असून त्यांच्या सेक्रेटरीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. आयपीएलदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये नेस वाडियानं शिवीगाळ तसंच विनयभंग केल्याची तक्रार अभिनेत्री प्रीती झिंटाने केली होती. यावेळी तिथे एका विख्यात माजी क्रिकेटपटूचा मुलगाही तिथे होता. त्याचा जबाब घेण्याबाबत मुंबई पोलिसांनी अजून निर्णय घेतलेला नाही. या प्रकरणाची प्रीती झिंटानं नेस वाडियांविरोधात केलेल्या आरोपांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. नुस्ली वाडियांना धमकी ?
- - पहिला कॉल उद्योजक नस्ली वाडियांच्या ऑफिसच्या लँडलाईनवर आला
- - नुस्ली वाडिया यांच्याबाबत सेक्रेटरीकडे चौकशी करण्यात आली
- - नुस्ली वाडियांशी संपर्क झाला नसल्यानं दुसर्या सेक्रेटरीच्या मोबाईलवर आणखी एक कॉल आला
- - फोन करणार्यानं आपण रवी पुजारी असल्याचं सांगितलं
- - ऑस्ट्रेलियातून हा फोन केल्याचा दावा त्यानं केला
- - नुस्ली वाडियांनी प्रिती झिंटा प्रकरणात लक्ष देऊ नये, अशी तंबी देण्यात आली
- - त्या सेक्रेटरीला मोबाईलवर इंग्रजीत मेसेजही मिळाला
- - हे कॉल VOIP म्हणजेच व्हाईस ओव्हर इंटरनेस प्रोटोकॉल या यंत्रणेद्वारे करण्यात आले.
- - तर जो मेसेज आला तो इराणमधल्या नंबरवरून करण्यात आला - सूत्र
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++