जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'प्रामाणिक मोदीं'चा दावा विकिलिक्सने ठरवला खोटा

'प्रामाणिक मोदीं'चा दावा विकिलिक्सने ठरवला खोटा

'प्रामाणिक मोदीं'चा दावा विकिलिक्सने ठरवला खोटा

17 मार्च : आपल्या खुलाशांनी जगभरात खळबळ माजवणार्‍या विकिलिक्स या वेबसाईटने आज (सोमवारी) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिल्यानं मोदींच्या प्रचार मोहिमेला चांगलाच धक्का बसलाय. मोदी हे प्रामाणिक असल्याचं विकिलिक्सचे संस्थापक ज्युलिअन असांज यांनी कधीच म्हटलेलं नाही, असं ट्विट विकिलिक्सनं केलंय. मोदी भ्रष्ट नाहीत आणि म्हणून अमेरिकेला मोदींची भीती वाटतं, असे असांजची स्वाक्षरी असलेले पोस्टर्स मोदी समर्थक गेले काही दिवस वाटत आहेत. जाहिरात पण, हे पोस्टर्स खोटे आहेत आणि भाजप समर्थक खोटा प्रचार करत असल्याचं विकिलिक्सनं म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    wikileaks_modi 17 मार्च : आपल्या खुलाशांनी जगभरात खळबळ माजवणार्‍या विकिलिक्स या वेबसाईटने आज (सोमवारी) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिल्यानं मोदींच्या प्रचार मोहिमेला चांगलाच धक्का बसलाय.

    मोदी हे प्रामाणिक असल्याचं विकिलिक्सचे संस्थापक ज्युलिअन असांज यांनी कधीच म्हटलेलं नाही, असं ट्विट विकिलिक्सनं केलंय. मोदी भ्रष्ट नाहीत आणि म्हणून अमेरिकेला मोदींची भीती वाटतं, असे असांजची स्वाक्षरी असलेले पोस्टर्स मोदी समर्थक गेले काही दिवस वाटत आहेत.

    जाहिरात

    पण, हे पोस्टर्स खोटे आहेत आणि भाजप समर्थक खोटा प्रचार करत असल्याचं विकिलिक्सनं म्हटलं आहे. मोदी हे लोकप्रिय आहेत आणि भारतीयांना ते प्रामाणिक वाटतात, असं आपल्या केबल्समध्ये म्हणण्यात आलं होतं, असं विकिलिक्सकडून स्पष्ट करण्यात आलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात