18 फेब्रुवारी : कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांना गेल्या काही महिन्यांपासूनच धमक्यांची पत्रे येत असल्याची माहिती पुढे आली आहे. ही माहिती कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी दिली. ‘तुमचा दाभोलकर करू’ असा आशय असलेल्या या पत्रावर पुणे पोस्टाचा शिक्का असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले. पानसरेंना ही धमक्यांची पत्रं सहा-सात महिन्यांपूर्वीत आली होती. त्यावर पुणे पोस्टाचा शिक्का होता. पण पानसरे यांनी या पत्राची दखल घेतली नसल्याचंही त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं. पोलिसांनी या सर्व शक्यता गृहीत धरून हल्ल्याचा तपास करावा अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याला 2 दिवस उलटूनही हल्लेखोर मोकाटच आहेत. पोलीस घटनांचा मागोवा घेत असून काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी सराईत टोळ्यांमधल्या 120 जणांची चौकशी केली आहे. पण हल्लेखोरांबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. या प्रकरणात उमा पानसरे यांचा जबाब अत्यंत महत्वाचा आहे. पोलिसांनी काल त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला पण त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. पोलिसांना जर आज हा जबाब घेता आला तर तपासाला गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पानसरेंची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. प्रसंगी मुंबई अथवा पुणे या ठिकाणी हलविण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास शासनातर्फे ‘एअर ऍम्ब्युलन्स’ची तयारीही ठेवण्यात आली असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पानसरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या शरीरातील तीन गोळया बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

)







