26 फेब्रुवारी : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाची कोणतीही माहिती देणार्या व्यक्तीला 25 लाख रुपयांचं बक्षीस राज्य सरकारने जाहीर केलं आहे. पानसरे यांच्या हत्येबद्दल कोणतीही माहिती असल्यास ती लगेचंच पोलिसांना द्यावी, असं आवाहनही राज्य सरकारकडून करण्यात आलंय.
पानसरेंच्या हत्येला दहा दिवस उलटले तरी हल्लेखोरांबाबत तपास यंत्रणेच्या हाती अद्याप काहीही ठोस माहिती लागू शकलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वीही हत्येशी संबंधीत कोणतीही माहिती देणार्या व्यक्तीला नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर कोल्हापूर पोलिसांकडून 5 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय.मात्र, त्यातूनही अद्याप काहीही निष्पन्न झालं नाहीये.
दरम्यान, पानसरे दाम्पत्याच्या उपचाराचा खर्च घेणार नसल्याच ऍस्टर आधार हॉस्पिटलच्या प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पानसरे दाम्पत्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारांसाठी कोल्हापूरमधील ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पानसरे कुटुंबीय आणि सरकारनेही हॉस्पिटलला पानसरेंच्या उपचाराचा खर्च देऊ केला होता पण तो खर्च घेण्यास हॉस्पिटल प्रशासनाने नकार दिला आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

)







