05 नोव्हेंबर : पवनहंस एअरलाइन्सचं हेलिकॉप्टर बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बॉम्बे हाय जवळच्या समुद्रात कोसळलं. या अपघातात पायलट आणि को-पायलट बेपत्ता झाले आहे. नौदल आणि तटरक्षक दलाने शोधमोहीम आणि बचावकार्य हाती घेतले आहे.
मुंबईच्या किनार्यापसून 150 किमीच्या अंतरावर हा अपघात झाला. बॉम्बे हायच्या तेलफलाटावर रात्रीच्या अंधारात लॅण्डिग करत असताना हे हेलिकॉप्टर तेलफलाटापासून दोन नॉटिकल मैल समुद्रात कोसळलं. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने हा आपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नौदलाने त्याच्या शोधासाठी एक हेलिकॉप्टर, नाइट व्हीजन असलेले विशेष हेलिकॉप्टर आणि दोन युद्धनौकाही तातडीने रवाना केल्या. रात्री उशीरा हेलिकॉप्टरचे काही अवशेष बचाव पथकाला समुद्रात तरंगताना आढळले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

)







