20 जून : अधिक महिना आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाने उद्यापासून म्हणजे रविवारपासून पंढरपुरच्या श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर भक्तांसाठी 24 तास खुले ठेवण्याचे निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे दर्शन रांगेत अनेक तास ताटकळत उभा राहणार्या वयोवृद्ध वारकर्यांना दिलासा मिळणार आहे.
रविवारपासून सुरू होणारी ही सुविधा आषाढी वारीच्या पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार आहे या धोरणात्मक निर्णयाचा आषाढी वारीसाठी येणार्या वारकरी भक्तांना लाभ घेता येणार आहे.
या शिवाय आषाढीत दशमी, एकादशी व व्दादशी हे तीन दिवस ऑनलाईन दर्शन सुविधा बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण जिल्हाधिकार्यांनी घेतलाय. या ऐतिहासिक निर्णयामुळे भक्तांना लाडक्या सावल्या विठ्ठलाचे दर्शन सुलभ व तत्पर मिळणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++