जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था मंदावले पण पादर्शकता येईल -राष्ट्रपती

नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था मंदावले पण पादर्शकता येईल -राष्ट्रपती

नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था मंदावले पण पादर्शकता येईल -राष्ट्रपती

25 जानेवारी : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. नोटबंदीच्या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलं. नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था तात्पुरती मंदावेल पण या निर्णयामुळे व्यवस्थेमध्ये जास्त पारदर्शकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी विधनासभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधीच लोकसभा आणि निवडणुका एकत्र घेण्याचा विचार अनेक वेळा बोलून दाखवलाय. या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी समर्थन दिल्यामुळे आता यावर देशभरात चर्चा सुरू होऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

      Pranab mukherjee  25 जानेवारी : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. नोटबंदीच्या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलं. नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था तात्पुरती मंदावेल पण या निर्णयामुळे व्यवस्थेमध्ये जास्त पारदर्शकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी विधनासभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधीच लोकसभा आणि निवडणुका एकत्र घेण्याचा विचार अनेक वेळा बोलून दाखवलाय. या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी समर्थन दिल्यामुळे आता यावर देशभरात चर्चा सुरू होऊ शकते. पंतप्रधान मोदींनी वन नेशन, वन इलेक्शन, अशी घोषणा दिलीय. त्याला राष्ट्रपतींनीही पाठिंबा दिलाय.  निवडणुका एकाच वेळा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सगळ्या राजकीय पक्षांशी चर्चा करावी, अशी सूचना राष्ट्रपतींनी केलीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी नोटबंदीच्या निर्णयाचंही समर्थन केलं. नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था तात्पुरती मंदावेल पण या निर्णयामुळे व्यवस्थेमध्ये जास्त पारदर्शकता येईल, असं ते म्हणाले. नोटबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसेल आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई तीव्र होईल, असं त्यांनी सांगितलं. आपण जेवढे कॅशलेस व्यवहारांकडे वळू, तेवढी व्यवहारात पारदर्शकता येईल, असंही राष्ट्रपती म्हणाले.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात