14 सप्टेंबर : नेटवर्क 18 च्या महिला पत्रकारावर हल्ला करणार्या हल्लेखोराला अटक करण्या आलीये. रामबाबू गोडीया असं या आरोपीचं नाव असून त्याला एन.एम.जोशी मार्ग पोलिसांनी अटक केलीय.
शनिवारी फिनीक्स मॉलमध्ये एका ऍवार्ड शोच कव्हरेज दरम्यान ही घटना घडली होती. शोचं कव्हरेज करून महिला पत्रकार आपल्या सहकार्यासोबत बाहेर पडताना अचानक या आरोपीने या महिला पत्रकारावर हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्वच गोंधळून गेले. पीडित महिला पत्रकार आणि तिच्या सहकार्यांनी या आरोपीला पकडलं. त्याच्यावेळी सुरक्षारक्षकही पोहचले. या आरोपीची तपासणी केली असता त्याच्याकडे या ऍवार्ड शोचा अनधिकृतपणे पास असल्याचं उजेडात आलं.
या आरोपीच्या विरोधात पीडित महिला पत्रकार एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पोहचली असता ऍवार्ड शोच्या आयोजकांना बोलावले असता त्यांनी सपेशल टाळाटाळ केली. खरंतर या आरोपीला या ऍवार्ड शोच्या आयोजक कंपनीच्या कर्मचार्याने पास दिला होता. पण तरीही या कंपनीच्या अधिकार्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. धक्कादायक म्हणजे या पूर्वीही मुंबईमध्ये अनेक महिला पत्रकारावर हल्ले झालेत. या हल्याचा सर्वत्र निषेध होत आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++