04 फेब्रुवारी : यंदाच्या पालिका निवडणुकीत परमार आत्महत्या प्रकरणात कारागृहात जाऊन आलेल्या आरोपींना अन्य पक्षांनी प्रवेश दिला नसला तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सर्वच आरोपी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.
यात सुधाकर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, तर परमार प्रकरणातील अन्य तीन सहकाऱ्यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात प्रभाग ५ मध्ये ड खुला प्रवर्ग मधून अपक्ष उमेदवारी अर्ज सुधाकर चव्हाण यांनी भरला आहे. तर राबोडी प्रभाग १० मधून राष्ट्रवादीच्या वतीने नजीबमुल्ला, प्रभाग ७ मधून काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि प्रभाग ६ मधून राष्ट्रवादीचे हनुमंत जगदाळे यांनी आपापले उमेदवारी अर्ज भरले आहेत. या चौघांचे पक्ष वेगवेगळे असले तरीही एकाच गुन्ह्यात सहभागी होते. त्यामुळे आता या उमेदवारांना जनताजनार्धन मताधिक्याने निवडून देते काय? याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv