03 मार्च : काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या गोटात दाखल झालेले लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी तब्बल दशकभरानंतर आज एका व्यासपीठावर आले.
बिहारमधल्या मुझफ्फरपूरमध्ये नरेंद्र मोदींची जाहीर सभा सुरू आहे. त्यात एनडीएत पुन्हा परतलेले पासवान यांनीही भाषण केलं. मागील आठवड्यात पासवान भाजपमध्ये दाखल झाले.
2002 मध्ये गुजरात दंगली झाल्यानंतर पासवान एनडीएतून बाहेर पडले होते. तेव्हापासून त्यांनी सतत मोदींवर टीका केली होती. पण आता निवडणुकीच्या तोंडावर पासवान यांनी बिहारमध्ये भाजपशी युती केलीय.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.