जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / देणगीच्या हव्यासापोटी विठ्ठलाच्या महापूजेचा घाट ?

देणगीच्या हव्यासापोटी विठ्ठलाच्या महापूजेचा घाट ?

देणगीच्या हव्यासापोटी विठ्ठलाच्या महापूजेचा घाट ?

31 जानेवारी : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात पुन्हा नित्यपूजा सुरू करण्याचा मंदिर समितीने घाट घातलाय. त्यासाठी भाविकांकडून 51 हजार रुपयांची देणगीही घेतली जाणार आहे पण नित्यपुजा सुरू झाली तर पुढे जाऊन महापुजाही सुरू केली जाऊ शकते. पण त्यामुळे विठ्ठलाच्या स्वयंभू दुर्मिळ मूर्तीची पुन्हा झीज होऊ शकते अशी भीती जाणकारांकडून व्यक्त केली जातेय. जाहिरात गेल्या सात वर्षापासून बंद असलेली श्री विठ्ठलाची महापूजा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय. भारतीय पुरातत्व विभागाने विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी तत्कालीन समितीला या विषयाच्या अनुषंगाने सक्त निर्देश दिले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    vithal 43 31 जानेवारी : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात पुन्हा नित्यपूजा सुरू करण्याचा मंदिर समितीने घाट घातलाय. त्यासाठी भाविकांकडून 51 हजार रुपयांची देणगीही घेतली जाणार आहे पण नित्यपुजा सुरू झाली तर पुढे जाऊन महापुजाही सुरू केली जाऊ शकते. पण त्यामुळे विठ्ठलाच्या स्वयंभू दुर्मिळ मूर्तीची पुन्हा झीज होऊ शकते अशी भीती जाणकारांकडून व्यक्त केली जातेय.

    जाहिरात

    गेल्या सात वर्षापासून बंद असलेली श्री विठ्ठलाची महापूजा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय. भारतीय पुरातत्व विभागाने विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी तत्कालीन समितीला या विषयाच्या अनुषंगाने सक्त निर्देश दिले होते.

    तथापि अण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने पुरातत्व विभागाच्या सुचनांना केराची टोपली दाखवून पुन्हा नित्यपुजेच्या नावाखाली महापूजा करण्याचा घाट घातला आहे. येत्या 19 फेब्रुवारीपासून 51 हजार रुपयांची देणगी देणार्‍या भक्तांना ही पूजा करता येणार असल्याने, देणगीच्या हव्यासापोटी समितीने हा निर्णय घेतला आहे की काय अशी शंका उपस्थित होते.

    दरम्यान, विठ्ठलाच्या पूजा सुरू कराव्यात अशी कोणतीही मागणी विठ्ठल भक्तातून होत नसताना समितीने पूजेचा अट्टाहास का केला या बाबतचे गूढ अकलनिय आहे. या पूर्वी तत्कालीन अध्यक्ष शशिकांत पागे यांच्या समितीने मूर्तीची झीज रोखण्यासाठी पंचधातूची उत्सव मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला होता आणि मूर्तीही तयार करण्यात आली होती पण हा विषय पुढे प्रलंबित राहिला.

    जाहिरात

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: vithal
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात