14 नोव्हेंबर : ‘शारदा चिट फंड’ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी जेलमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कुणाल घोष यांनी काल (गुरुवारी) रात्री कोलकात्यातील प्रेसिडन्सी जेलमध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
कुणाल घोष शारदा चिट फंड घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी चिटफंड घोटाळ्यात सामील असलेल्या इतर आरोपींविरोधात सीबीआयने तीन दिवसांच्या आत कारवाई केली नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती. या प्रकरणी ते गेल्या नोव्हेंबरपासून तुरुंगात आहेत. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++