11 जुलै : वादग्रस्त इस्लामी विचारवंत झाकीर नाईक यांच्या अनेक सीडी आणि पुस्तकं मुंबई पोलीस तपासणार आहेत. इंटरनेटवर त्यांची भाषणंही पोलीस तपासणार आहेत. मुंबई पोलिसांमधल्या उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती सीएनएन न्यूज 18ला दिलीये. जर या सीडीमधलं काही आढळलं नाही, तर इस्लामच्या अभ्यासकांचीही मदत पोलीस घेणार आहेत. ज्या आरोपींनी नाईक यांच्या भाषणांतून प्रेरणा मिळाली असं सांगितलं, त्यांचीही पुन्हा चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, नाईक पत्रकार परिषद घेण्यासाठी भारतात येणार नसून स्काईपद्वारे पत्रकार परिषदेत सामील होणार असल्याचं त्याच्या मुंबईतील प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय. नाईक त्यांच्याभोवती निर्माण झालेल्या वादाविषयी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणार होते. पण ते आता ही पत्रकार परिषद घेणार नाहीयेत. त्यांच्या कार्यालयानं याची पुष्टी दिलीये. ते यासाठी भारतात येणार नव्हतेच, ते मदिनाहून स्काईपद्वारे पत्रकारांशी बोलू शकतात, असं त्यांच्या सहकार्यांनी सांगतिलंय. यामुळे नाईक नजिकच्या काळात भारतात परतणार की नाही, यावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv