जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / जिया खान मृत्यू प्रकरणाचा निकाल जलद गतीने लावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

जिया खान मृत्यू प्रकरणाचा निकाल जलद गतीने लावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

जिया खान मृत्यू प्रकरणाचा निकाल जलद गतीने लावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

18 मे : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणाचा निकाल जलद गतीनं लावावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला दिले आहे. 25 वर्षीय जिया ही 3 जून 2013 रोजी मुंबईतील घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करतंय. मात्र, तपासाबाबत संतुष्ट नसल्याचं जियाच्या आईचं म्हणणं आहे. एसआयटीने तपास करावा आणि मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी करावी, असे त्या म्हणाल्या. जियाच्या आईनं गेल्या आठवड्यात अभिनेता सूरज पांचोली याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

    jiah_khan3 18 मे : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणाचा निकाल जलद गतीनं लावावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला दिले आहे. 25 वर्षीय जिया ही 3 जून 2013 रोजी मुंबईतील घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करतंय. मात्र, तपासाबाबत संतुष्ट नसल्याचं जियाच्या आईचं म्हणणं आहे. एसआयटीने तपास करावा आणि मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी करावी, असे त्या म्हणाल्या. जियाच्या आईनं गेल्या आठवड्यात अभिनेता सूरज पांचोली याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सूरजने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सूरजविरुद्ध हत्येचा आरोप लावून या खटल्याची सुनावणी केली जावी, असेही फिर्यादी पक्षाने म्हटले होते.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात