27 डिसेंबर :जम्मूजवळ आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्यांवर आज (शनिवार) पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. आरएस पुरा सेक्टरमधील अरनिया येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरील बीएसएफच्या चौक्यांवर आज पहाटे 1च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. आधुनिक शस्त्रास्त्रांच्या साहाय्याने पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. बीएसएफच्या जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे तासभर गोळीबार सुरू होता. या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही. पाकिस्तानी सैन्याने याच आठवड्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौकीवर गोळीबार केला होता.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++