18 सप्टेंबर : गेली दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाच्या सेवेत मग्न झालेला भक्त जड पावलाने आपल्या गणरायाला निरोप देण्यासाठी निघालाय. पण मुंबईत गणेशभक्तांच्या आनंदात विघ्न आलंय. गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे आणि जेलेफिश मासे आढळून आल्यामुळे खळबळ उडालीय. गणेशभक्तांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. या माशांनी हल्ला केल्याची घटना अगोदरही घडली होती. दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देतांना 55 गणेशभक्तांवर या माशांची हल्ला केला होता. मासे चावल्यामुळे 55 भक्तांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या माशाचा चावल्यामुळे कोणतीही जीवतहानी झाली नसली तरीही खबरदारी म्हणून पाण्यात उतरू नयेच असं आवाहन पालिकेनं केलंय. समुद्रकिनार्यावर बाप्पाच्या विसर्जनासाठी तराफ आणि छोट्या बोटेची व्यवस्था करण्यात आलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.