जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / दाभोलकरांच्या खुनामागे धर्मांध शक्तींचा हात नाही !

दाभोलकरांच्या खुनामागे धर्मांध शक्तींचा हात नाही !

दाभोलकरांच्या खुनामागे धर्मांध शक्तींचा हात नाही !

** 29 नोव्हेंबर :**डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी पुणे गुन्हे शाखेनं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. दाभोलकरांच्या खुनामागे कोणत्याही धर्मांध शक्तीचा हात नसल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे दाभोलकरांच्या खुनाचं गूढ आता आणखी वाढलंय. दाभोलकरांना धमक्या आलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं नव्हतं असंही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. दाभोलकर यांचा 20 ऑगस्टला पुण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. दाभोलकर यांच्या खुनाप्रकरणी केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर पुणे गुन्हे शाखेनं हे प्रतिज्ञापत्र सादर केलंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    ** narendra dabholkar 29 नोव्हेंबर :**डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी पुणे गुन्हे शाखेनं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. दाभोलकरांच्या खुनामागे कोणत्याही धर्मांध शक्तीचा हात नसल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे दाभोलकरांच्या खुनाचं गूढ आता आणखी वाढलंय. दाभोलकरांना धमक्या आलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं नव्हतं असंही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. दाभोलकर यांचा 20 ऑगस्टला पुण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. दाभोलकर यांच्या खुनाप्रकरणी केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर पुणे गुन्हे शाखेनं हे प्रतिज्ञापत्र सादर केलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात