जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'कोणताही एक व्यक्ती देश चालवू शकत नाही'

'कोणताही एक व्यक्ती देश चालवू शकत नाही'

'कोणताही एक व्यक्ती देश चालवू शकत नाही'

24 जानेवारी : कोणताही एक माणूस देश चालवू शकत नाही अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुख राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली. तसंच कोणतीही व्यक्ती एका दिवसात देश बदलू शकत नाही असा टोलाही राहुल गांधी यांनी आम आदमी पार्टीला लगावला. येत्या पंधरा दिवसांत तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू होईल, असंही राहुल यांनी जाहीर केलं. राहुल गांधी आज (शुक्रवारी) विदर्भ दौर्‍यावर आहे. ‘राजीव गांधी पंचायती राज संघटन’मध्ये राहुल काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    rahul vs modi54q 24 जानेवारी : कोणताही एक माणूस देश चालवू शकत नाही अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुख राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली. तसंच कोणतीही व्यक्ती एका दिवसात देश बदलू शकत नाही असा टोलाही राहुल गांधी यांनी आम आदमी पार्टीला लगावला.

    येत्या पंधरा दिवसांत तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू होईल, असंही राहुल यांनी जाहीर केलं. राहुल गांधी आज (शुक्रवारी) विदर्भ दौर्‍यावर आहे. ‘राजीव गांधी पंचायती राज संघटन’मध्ये राहुल काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केलं. यावेळी ते बोलत होते.

    जाहिरात

    या अगोदरही काँग्रेसच्या परिषदेत राहुल यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. एकदिवसीय दौर्‍यावर आलेल्या राहुल गांधी यांनी विदर्भकरांशी संवाद साधलाय. आज राहुल गांधी यांनी वर्धा भेटीदरम्यान सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमाला म्हणजेच बापूकुटीला प्रथम भेट दिली. आश्रमाच्या परिसरात पाऊण तास घालवला. संपूर्ण आश्रमाची त्यांनी पाहणी केली, वृक्षारोपण केले. आणि आश्रमात राहणार्‍या गांधीवादी सहकार्‍यांशी संवाद साधला.

    त्यानंतर आता ‘राजीव गांधी पंचायती राज संघटन’मध्ये राहुल काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांंना मार्गदर्शन केलं. राहुल यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये आश्रमाला भेट दिली होती. काँग्रेस पक्षाचा लोकसभा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी 2009 मध्ये राहुल गांधी वर्ध्यात आले होते. आताही ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वर्ध्याचीच निवड केलीय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात