30 ऑक्टोबर :विधानसभा निवडणुकीच्या पराभवातून मरगळ झटकून काँग्रेस कामाला लागली आहे. काँग्रेसच्या विधानसभा गटनेतेपद आणि प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी हालचाल सुरू झालीये. प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नावाचीही चर्चा आहे. तर गटनेतेपदी काँग्रेसचे लातूरचे आमदार अमित देशमुख आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे काँग्रेस पुरती खचलीय. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदसुद्धा मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत विधानसभेच्या गटनेतेपदासाठी वरिष्ठ नेते फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे एखाद्या युवा नेत्याच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडू शकते. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर संग्राम थोपटे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, पतंगराव कदम यांचीही नाव चर्चेत आहे. तर माणिकराव ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्तपदावर अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील आणि नारायण राणे यांचे नाव चर्चेत आहे. पण त्याचवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पराभूत झालेल्या वरिष्ठ नेत्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. एकूणच गटनेतेपद आणि प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये मरगळ झटकण्याचा प्रयत्न होणार आहे. काँग्रेसचा गटनेता कोण? अमित देशमुख संग्राम थोपटे बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे पाटील पतंगराव कदम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण ? अशोक चव्हाण हर्षवर्धन पाटील नारायण राणे रजनीताई पाटील विलास मुत्तेमवार +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++