07 जुलै : ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. 1964 साली ‘ए मेरे वतन के लोगो’, हे गाणं तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यासमोर गाण्यासाठी मला बोलावलं होतं. गाण्याची रिहर्सलही झाली होती. पण ऐनवेळी व्यासपीठामागे मला सांगण्यात आलं की तुम्हाला इतर गाणी गावी लागतील, असा दावा कल्याणपूर यांनी केलाय. हे गाणे माझ्याकडून हिरावून घेण्याचं कोडं अजूनही उलगडलेलं नाही असंही त्या म्हणाल्या. नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कल्याणपूर यांनी हा खुलासा केला. ‘ए मेरे वतन के लोगो’ या ऐतहासिक गाण्याला 50 वर्ष पूर्ण झालीय. भारत आणि चीन युद्धानंतर कवी प्रदीप यांनी हे गीत लिहलं होतं. हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं पाहिजे असा हट्ट कवी प्रदीप यांनी धरला होता. अखेर हे गीत 26 जानेवारी 1963 रोदी दिल्लीतील रामलीला मैदानावर लतादीदींच्या आवाजात सादर करण्यात आलं. यावेळी देशभक्तीने भारलेल्या देशातली प्रत्येक नागरिक अक्षरश : ढसाढसा रडला होता. खुद्द पंडित नेहरुंच्या डोळ्यात अश्रू आले होते. पण हेच गीत आपण गाणार होतो असा खुलासा कल्याणपूर यांनी केल्यामुळे खळबळज उडालीय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++