जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'ए दिल है मुश्किल'ला आमचा विरोध कायम - अमेय खोपकर

'ए दिल है मुश्किल'ला आमचा विरोध कायम - अमेय खोपकर

'ए दिल है मुश्किल'ला आमचा विरोध कायम - अमेय खोपकर

19 ऑक्टोबर : ‘ए दिल है मुश्किल सिनेमाला आमचा विरोध कायम असून आम्ही तो सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, या भूमिकेवर आम्ही अजूनही ठाम असल्याचं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलं आहे. ‘पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्यासंदर्भातील हे आंदोलन आहे’, असंही त्यांनी सांगितलं आहे. माझ्यासाठी देश महत्त्वाचा असून देशाच्या जवानांना मी सलाम करतो अशी भावनिक प्रतिक्रिया देत करण जोहरने काल फेसबूकच्या माध्यमातून या संपूर्ण वादावरचं आपलं मौन सोडलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :
    SADAKJIEIE

    19 ऑक्टोबर : ‘ए दिल है मुश्किल सिनेमाला आमचा विरोध कायम असून आम्ही तो सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, या भूमिकेवर आम्ही अजूनही ठाम असल्याचं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलं आहे. ‘पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्यासंदर्भातील हे आंदोलन आहे’, असंही त्यांनी सांगितलं आहे.

    माझ्यासाठी देश महत्त्वाचा असून देशाच्या जवानांना मी सलाम करतो अशी भावनिक प्रतिक्रिया देत करण जोहरने काल फेसबूकच्या माध्यमातून या संपूर्ण वादावरचं आपलं मौन सोडलं होतं. यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असंही त्याने जाहीर केलं. ‘ऐ दिल है मुश्कील’ सिनेमासाठी 300 जणांनी दिवस-रात्र मेहनत घेतली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्या अशी विनंती करण जोहरने केली होती.

    जाहिरात

    करणच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद शमेल आणि ‘ऐ दिल..’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होईल अशी आशा होती. पण मनसेने मात्र त्यांची विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. करण जोहरला उशीरा जाग आली, ऐवढ्या दिवसात त्याला हे सगळे लक्षात का आले नाही असा प्रश्न खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

    दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या ‘ए दिल है मुश्किल’मध्ये पाकिस्तानी कलाकर फवाद खान असल्यामुळे हा सिनेमा चांगलाच अडचणीत आला आहे. उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात असंतोष पसरला आहे. पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका मनसेने घेतली आहे. सिंगल स्क्रीन थिएटर चालकांनी पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट दाखवणार नाही असे जाहीर केले आहे. तर मल्टीप्लेक्स चालकांनी हा चित्रपट दाखवल्यास ‘फटाके’ फुटतील असा सूचक इशाराच मनसेने दिला आहे. त्यामुळे ‘ऐ दिल है मुश्कील’चे प्रदर्शनच आता ‘मुश्कील’चं झाले आहे.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात