30 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात चिखलफेक सुरूच आहे. भाजपच्या ‘फायरब्रँड’ उमा भारतींनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलीय. रॉबर्ट वडरा यांची पत्नी प्रियांका गांधी या राखी सावंत सारखं अर्थहीन बोलत राहते असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेत्या उमा भारती यांनी केलंय. झाशीमधल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींची तुलना राखी सावंत यांच्याशी केली आहे. रॉबर्ट वडरा यांची पत्नी माझ्यावर आरोप करते की, मी त्यांचं नाव घेऊन पब्लिसिटी स्टंट करते, त्यामुळे आता मी त्यांचं नाव घेणं बंद केलंय. आता मी त्यांचा उल्लेख रॉबर्ट वडराची पत्नी असाच करणार असंही भारती म्हणाल्या. भारती एवढ्यावर थांबल्या नाही. प्रियांका ज्या प्रकारे टीका करत असता असं तर राखी सावंतही बोलते तीच्या बोलण्याला काही अर्थ नसतो अशी खिल्लीही भारती यांनी उडवली. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++